Ad will apear here
Next
पवारवाडी येथील स्वच्छतागृहांचे लोकार्पण
माजलगाव (बीड) : येथील देवकृपा ग्रुपचे अध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी स्वखर्चातून उभारलेल्या पवारवाडी येथील ३० स्वच्छतागृहांचे लोकार्पण रविवारी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी गावकऱ्यांना या स्वच्छतागृहांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

त्या पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘शासनाच्या योजना राबवितानाच समाजपरिवर्तनासाठी विविध घटकांचा पुढाकारही आवश्यक असतो. त्याशिवाय सर्वांगीण प्रगती अशक्य आहे. अनेक गावांत आजही महिलांना उघड्यावर शौचासाठी जावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे. स्वच्छतागृहांसाठी शासन लाभार्थ्यांना अनुदान देते. त्यामुळे शौचालय बांधकामाकरिता सर्वांचा पुढाकार असणे गरजेचे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५८ टक्के शौचालये बांधण्यात आली आहेत. आप्पासाहेब जाधव यांनी स्वखर्चातून बांधलेल्या या स्वच्छतागृहांमुळे गावकऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. त्यांचे काम कौतुकास्पद आहे.’

या वेळी आप्पासाहेब जाधव यांनी गावकऱ्यांच्या ऋणातून उतराई होता आले याचे समाधान असल्याची भावना व्यक्त केली. यापुढेही गावच्या विविध विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

पवारवाडीत स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे येथे स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुंडे यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी स्मशानभूमी उभारण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार होत्या. आमदार आर. टी. देशमुख, नगराध्यक्ष सहाल चाऊस, बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे, जि. प. सदस्य कल्याण आबूज, नितीन नाईकनवरे, जि. प. सीईओ नामदेव ननावरे यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZXDBE
Similar Posts
पंकजा मुंडे यांच्या हस्ते खेळपट्टीचे लोकार्पण परळी   (बीड) : येथील रेवली परिसरातील रणजी क्रिकेटपटू भूषण भीमा नावंदे यांनी ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खेळपट्टी (पिच) तयार केली आहे, खेळपट्टीचे लोकार्पण एक जुलै रोजी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.  या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भारताची आणि मुंबईची सलामीवीर स्मृती मंथाना सध्या
पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रयत्नांना यश बीड : बीड शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बिंदुसरा नदीवरील पूल नुकत्याच झालेल्या पावसामुळे खचला होता. यामुळे या महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी पुलाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगामासाठी धनादेश वाटप परळी वैजनाथ (बीड) : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याशी करार केलेले ऊसतोड कामगार, वाहतूक ठेकेदार यांना २८ जून रोजी एका कार्यक्रमात गळीत हंगाम २०१७-१८साठी पहिल्या हप्त्याचे धनादेश वाटप करण्यात आले. ‘या वर्षीच्या गळीत हंगामात वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाच लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार आहे. यासाठी
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे उद्घाटन बीड : येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या १७व्या शाखेचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. ‘बँकेच्या माध्यमातून दीनदयाळ उपाध्याय यांचे अंत्योदयाचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ही बँक जनसामान्यांच्या मदतीसाठी तत्पर असेल,’ असे सांगून पंकजा मुंडे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language